ICG Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गट सी विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाछी पात्र आणि इच्छुक उमेदवार ICG भर्ती 2022 साठी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईट अर्ज करु शकतात. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2022 आहे. या तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार अधिसूचनेमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे पाठवू शकतात.


रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या
जारी केलेल्या अधिसुचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत भारतीय तटरक्षक दलात मोटार ट्रान्सपोर्ट फिटरची पाच पदे, स्प्रे पेंटरची एक पद आणि मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिकच्या एका पदावर भरती केली जाणार आहेत. एकूण रिक्त पदांपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहा पदे आणि इतर मागासवर्गीयांसाठी एक पद रिक्त आहेत.


किती असेल पगार?
गट सी पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 2 अंतर्गत दरमहा 19,900 रुपये पगार दिला जाईल.


शैक्षणिक पात्रता जाणून घ्या
भारतीय तटरक्षक दलात  गट क पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संबंधित क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा.


वयोमर्यादा
या पदांवरील भरतीसाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे असावं. सरकारी नियमांनुसार ओबीसी उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.


कशी असेल निवड प्रक्रिया?
भारतीय तटरक्षक दलातील या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. ही लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार ICG गट C भरती 2022 साठी 9 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट देऊ अधिसूचना तपासावी.


महत्त्वाच्या इतर बातम्या