IBPS RRB Recruitment 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) लिपिक भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत इच्छुक उमेदवार 27 जून 2022 पर्यंत अर्ज करु शकतात. यासाठीची भरती प्रक्रिया 07 जून 2022 पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 18 जुलै ते 23 जुलै 2022 या कालावधीत पूर्व प्रशिक्षण चाचणी घेण्यात येईल. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये होईल, अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. तर निकाल सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे. पदांच्या संख्येबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
महत्वाची तारीख
IBPS RRB PO लिपिक 2022 अधिसूचना जारी झाल्याची तारीख : 06 जून 2022
अर्ज सुरू करण्याची तारीख : 7 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2022
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) : 18 जुलै ते 23 जुलै 2022
प्राथमिक परीक्षेची तारीख : ऑगस्ट 2022
प्राथमिक परीक्षेच्या निकालाची तारीख : सप्टेंबर 2022 मध्ये
मुख्य परीक्षेची तारीख : सप्टेंबर 2022
मुख्य परीक्षेची तारीख : ऑक्टोबर 2022
अधिकारी तिसरी आणि 3री परीक्षा तारीख : सप्टेंबर 2022
वयोमर्यादा
ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्षे आहे आणि 32 वर्षांवरील उमेदवार सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. शैक्षणिक संबंधित माहितीसाठी, तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Gyanvapi Row : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायधीशांना धमकीचं पत्र
- Moose Wala Murder : 10 दिवस... 8 जण कैद; कसा रचला सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट?
- Monsoon Update : 15 जूनपासून मान्सून वेग पकडणार, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.