AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India, AAI) ने या पदांवर कनिष्ठ कार्यकारी, हवाई वाहतूक नियंत्रण (Junior Executive, Air Traffic Control)या पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2022 पर्यंत चालेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 हून अधिक पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा 

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 15 जून 2022ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022

भरती प्रक्रियेतील रिक्त जागांचा तपशील

ज्युनियर एग्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : 400

भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह B.Sc किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला 10+2 स्तरावर बोललं आणि लिहिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच किमान प्रवीणता असणं आवश्यक आहे.

वेतनश्रेणी 

कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या अर्जदारांना 40000 ते 140000 रुपये वेतन दिले जाईल.

वयोमर्यादा 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची 14.07.2022 रोजी कमाल वयोमर्यादा 27 वर्ष असावी. मात्र, शासनाच्या नियमानुसार, वयात सवलत दिली जाईल.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :