BSF Recruitment 2022 : देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलाकडून गट ब आणि क गटातील अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत या rectt.bsf.gov.in वेबसाइटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना 28 जून 2022 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची भरती प्रक्रिया 30 मेपासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 281 पदांची भरती केली जाणार आहे.
रिक्त जागा तपशील
उपनिरीक्षक (मास्टर) - 08 पदे
उपनिरीक्षक (इंजिन ड्रायव्हर) - 06 पदे
उपनिरीक्षक (वर्कशॉप) - 02 पदे
हेड कॉन्स्टेबल (मास्टर) - 52 पदे
हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) - ६४ पदे
हेड कॉन्स्टेबल (वर्कशॉप) - 19 पदे
कॉन्स्टेबल (क्रू) - 130 पदे
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झालेले असावेत. या पदांवरील निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिसूचना प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
उपनिरीक्षक (मास्टर आणि इंजिन ड्रायव्हर) पदांसाठी इच्छुक उमेदवाराचं वय 22 ते 28 वर्षे आणि इतर सर्व पदांसाठी उमेदवाराचं वय 20 ते 25 वर्षे असावं. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
या भरतीअंतर्गत अर्जदारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी, शारीरिक मापन चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, ट्रेड टेस्ट आणि वैद्यकीय परीक्षा यांच्या आधारे केली जाईल.
परीक्षेचा पॅटर्न
या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत उमेदवारांना 100 गुणांचे 100 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना दोन तासांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना किमान 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.