​Homi Bhabha Centre For Science Education Jobs 2022 : होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (Homi Bhabha Centre For Science Education), TIFR मुंबई यांनी प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 28 मे पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिसूचना तपासू शकतात. अधिक माहितीसाठी  hbcse.tifr.res.in होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे 8 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. 


रिक्त जागांचा तपशील


प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर-ई, प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर-बी, प्रोजेक्ट असिस्टंट आणि ट्रेड्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) यापैकी प्रत्येकी एका पदावर भरतीद्वारे उमेदवारांची नियुक्त केली जाणार आहे. तर प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-बी या पदांसाठी तीन रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी उमेदवार भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात. 


कसा कराल अर्ज? 



  • इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनची अधिकृत वेबसाईट www.hbcse.tifr.res.in वर भेट द्यावी. 

  • त्यानंतर होमपेजवर असलेल्या पोजिशन ओपनवर क्लिक करा. 

  • त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी “To apply for any of the posts listed above, please visit the https://secure.hbcse.tifr.res.in/posts/” या लिंकवर क्लिक करावं.

  • आता उमेदवारांनी येथे नोंदणी करुन आपला अर्ज भरावा. 

  • अर्ज भरताना मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. 

  • सबमिट बटणावर क्लिक करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आउट काढा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI