Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.


भारतीय कृषी संशोधन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 



भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI)


या ठिकाणी सहाय्यक हवेत


पोस्ट – सहाय्यक (ICAR संस्था)


शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा – 391


वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 जून 2022


तपशील - iari.res.in


 


दुसरी पोस्ट - सहाय्यक (ICAR HQ)


शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण जागा - 71


वयोमर्यादा – 20 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 जून 2022


तपशील - iari.res.in



महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान, मुंबई


पोस्ट - अकाऊंटंट, असिस्टंट, असोसिएट, नोडल ऑफिसर, स्टिअरिंग काऊंसिल कोऑर्डिनेटर


शैक्षणिक पात्रता - B.Com, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, MBA (विस्ताराने माहती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)


एकूण जागा - 9


अर्ज पाठवण्याचा पत्ता - ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान (व्हीएसटीएफ) सी-विंग, दुसरा मजला, मित्तल टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई - 400021


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022


तपशील - www.mvstf.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये working with us वर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक पोस्टविषयीची वेगवेगळी लिंक दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)


 


ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे


पोस्ट - ITI ट्रेड अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता - ITI उत्तीर्ण


एकूण जागा - 31


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मे 2022


तपशील - niv.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या news & events मध्ये Applications are invited for ITI trade apprentices या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)