Uttar Pradesh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सध्या त्याच्या अनेक डुप्लिकेट्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सलमानच्या एका डुप्लिकेटचा रिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आझम अन्सारी (Azam Ansari ) असं या सलमानच्या डुप्लिकेटचं नाव आहे. पण या सलमानच्या डुप्लिकेटला रिल व्हिडीओ करणं महागात पडलं आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काल (8 मे) डुप्लिकेट सलमान खानला अटक केली आहे.
सलमानचा डुप्लिकेट हा घंटाघर येथे रिल तयार करत होता. डुप्लिकेट सलमान खानला पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते. परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. तो व्हिडीओ शूट करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डुप्लिकेट सलमानवर कलम 151 अंतर्गत शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल ठाकूरगंज पोलिसांनी त्याला दंड ठोठावला आणि अटक केली.
सलमान खानच्या डुप्लिकेटच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. त्याला यूट्यूबवर 1 लाख 67 हजार नेटकरी फॉलो करतात.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...