GSL Recruitment 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. गोवा शिपयार्ड लिमिटेडनं अनेक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी त्यांनी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, शिपयार्डद्वारे विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. जी 22 एप्रिल 2022 पर्यंत सुरु राहिल. इच्छुक उमेदवार goashipyard.in वर जाऊन अर्ज करू शकतील.
गोवा शिपयार्ड लिमिटेड भर्ती 2022 महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2022अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 एप्रिल 2022
शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 33 वर्ष असावं. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 3 वर्ष आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. उमेदवाराचं वय 28 फेब्रुवारी 2022 पासून मोजलं जाईल.
निवड प्रक्रिया
मुलाखतीच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल. यासाठी निवडलेल्या उमेदवारांना माहिती दिली जाईल.
अर्ज फी
अर्ज करणार्या सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. त्याच वेळी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CISF मध्ये सामील होण्याची उत्तम संधी! बंपर भरती, कसा कराल अर्ज?
- SBI Bank Vacancy : पदवीधर तरुणांसाठी थेट मुलाखतीद्वारे बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
- ECGC PO 2022 Recruitment : प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी 75 जागांची भरती, ऑनलाइन अर्ज आजपासून सुरु, वाचा संपूर्ण माहिती
- Mumbai Metro : मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; दोन लाखापर्यंत मिळेल पगार, असा करा अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha