Employees State Insurance Corporation Jobs 2022 : नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी तुमच्यासाठीच. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) ने भरतीसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरती मोहिमेद्वारे सहाय्यक प्राध्यापकांसह इतर पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार ESIC च्या अधिकृत साइट esic.nic.in वरून अर्ज डाउनलोड करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.


ESIC Recruitment 2022 : रिक्त पदांचा तपशील 


या भरती प्रक्रिये अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 88 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांची 9 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 29 पदं आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 50 पदांचा समावेश करण्यात आला आहे.


ESIC Recruitment 2022 : पात्रतेचे निकष 


या भरीत अंतर्गत वेगवेगळ्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत अधिक तपशील तपासू शकतात. 


ESIC Recruitment 2022 : निवड प्रक्रिया


नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना निकाल त्यांना ई-मेल/एसएमएसद्वारे पाठवले जातील. तसेच, निकाल अधिकृत साइटवर देखील प्रदर्शित केला जाईल.


ESIC Recruitment 2022 : अर्ज शुल्क 


SC/ST/PDW/ विभागातील उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक यांना या भरती मोहिमेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 225 रुपये भरावे लागतील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार ESIC ची अधिकृत साइट पाहू शकतात.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :