UPSC Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यूपीएससी (UPSC) कडून भारतीय माहिती सेवा सहाय्यक संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ छायाचित्र अधिकारी या पदांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊ अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 01 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. तुम्हाला upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करता येईल.
 
रिक्त पदांचा तपशील



  • सहाय्यक संचालक (नियमन आणि माहिती), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय : 02 पदं

  • उड्डाण प्रशिक्षण उपसंचालक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय : 04 पदं

  • नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये वैज्ञानिक अधिकारी (नॉन डिस्ट्रक्टिव्ह), ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण : 01 पद

  • फोटोग्राफिक अधिकारी, जनसंपर्क संचालनालय, संरक्षण मंत्रालय : 01 पद

  • वरिष्ठ फोटोग्राफिक अधिकारी, जनसंपर्क संचालनालय, संरक्षण मंत्रालय : 01 पद

  • केंद्रीय फॉरेंसिक सायन्स लॅबमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (भौतिकशास्त्र), फॉरेन्सिक सायन्स सेवा संचालनालय, गृह मंत्रालय : 01 पद

  • केंद्रीय फॉरेंसिक सायन्स लॅबमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (न्यूट्रॉन सक्रियण विश्लेषण), फॉरेन्सिक सायन्स सेवा संचालनालय, गृह मंत्रालय : 01 पद

  • भारतीय माहिती सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील रिक्त पदं : 22 पदं

  • रेल्वे पदवी महाविद्यालय, सिकंदराबाद, रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय येथे प्राचार्य : 01 पद

  • नॅशनल अॅटलस आणि थीमॅटिक मॅपिंग ऑर्गनायझेशन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे संचालक : 01 पद

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / बांधकाम सर्वेक्षण (सिव्हिल), पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभाग, दिल्ली सरकारचे एनसीटी : 02 पदं


शैक्षणिक पात्रता


जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय माहिती सेवेच्या वरिष्ठ श्रेणीच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे. तर वरिष्ठ फोटोग्राफिक अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी आणि फोटोग्राफीच्या विविध शाखांमध्ये तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे बी.टेक पदवी असणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. 


वयोमर्यादा


या भरती मोहिमेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे, त्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचा. अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
कशी अशी असेल निवड प्रक्रिया?


अधिसूचनेनुसार या विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
 
अर्ज कसा कराल?


भरतीसाठी इच्छुक उमेदवार 01 सप्टेंबरपर्यंत upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.