​Bank of Maharashtra Recruitment 2022: बँकेत नोकरी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये भरती (Bank of Maharashtra Job) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार बँकेत बंपर पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.


बँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी करण्यात आलेल्या भरती अंतर्गत 551 पदं भरण्यासाठी ही भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आय प्रक्रिये अंतर्गत स्केल I, III, IV आणि V प्रोजेक्ट 2023-2024 मध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता वेगळ्या पद्धतीनं निश्चित करण्यात आली आहे. 


अर्ज शुल्क 


या भरतीसाठी इच्छुक असाल, तर झटपट अर्ज करा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. भरतीसाठी अर्ज करणार्‍या सामान्य / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 1180 रुपये भरावे लागतील. तर SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 118 रुपये ठेवण्यात आलं आहे.


अर्ज कसा कराल? 



  • बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in ला भेट द्या

  • त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटच्या होम पेजवरील करिअर टॅबवर क्लिक करावं. 

  • होम पेज ओपन झाल्यावर रिक्रूटमेंट प्रोसेसवर क्लिक करा आणि नंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा. 

  • त्यानंतर उमेदवार अर्ज या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक ती सर्व माहिती भरा. 

  • आता अर्ज शुल्क भरा. 

  • फॉर्म सबमिट करा. 

  • त्यानंतर फॉर्म डाउनलोड करा. 

  • शेवटी भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्या. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


​​VNIT Recruitment 2022: VNIT मध्ये तांत्रिक सहाय्यकासह अनेक पदांसाठी भरती; असा करा अर्ज