VNIT Nagpur Recruitment 2022: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
या मोहिमेअंतर्गत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरमध्ये अधीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ आणि इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंटरमीडिएट/ITI/बॅचलर डिग्री/BE/B.Tech/डिप्लोमा/MCA/मास्टर्स पदवी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित स्पेशलायझेशनमधील समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्क
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/EWS उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
VNIT Nagpur Recruitment 2022: कशी होणार निवड?
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या भरतीअंतर्गत या पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड शॉर्टलिस्टिंग, लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करायचा?
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूरने जारी केलेल्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट vnit.ac.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. अर्जदारांनी फॉर्मची हार्ड कॉपी 2 जानेवारीपूर्वी अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.
VNIT Nagpur Recruitment 2022: या मोहिमेसाठी अर्ज करा
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीने 254 पदांची भरती केली आहे. या भरती मोहिमेद्वारे AIIMS मध्ये वैज्ञानिक, वैद्यकीय समाज कल्याण अधिकारी, तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), फार्मासिस्ट यासह अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार aiims.edu/en ला भेट देऊ शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या: