Bank Job News : तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर मोठी संधी निर्माण झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) स्थानिक बँक अधिकारी पदाच्या 1500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार विहित शुल्क भरुन बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. आज म्हणजेच 13 नोव्हेंबर ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. जाणून घेऊन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया. 


जर तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट unionbankofindia.co.in ला भेट देऊन स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या 1500 पदांसाठी अर्ज करू शकता. 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक देखील अर्ज करु शकत नाहीत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, अर्जदाराचे किमान वय 1 ऑक्टोबर 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. यासोबतच, भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची प्रक्रिया काय?


अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जावे लागेल. वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावरील भरतीवर गेल्यानंतर, वर्तमान भर्ती विभागात क्लिक करा. अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि पुढे जा. यानंतर, प्रथम आवश्यक तपशील प्रविष्ट करुन नोंदणी करा, त्यानंतर आवश्यक माहिती देऊन फॉर्म भरा. शुल्क जमा करा आणि सबमिट करा. यामध्ये स्वाक्षरी आणि छायाचित्राचा समावेश आहे. भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ठेवा.


कोणत्या राज्यात किती पदे भरली जातील?


युनियन बँकेत भरती देशभरातील विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये कर्नाटकात सर्वाधिक 300 पदे भरली जाणार आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशमध्ये 200, आसाममध्ये 50, गुजरातमध्ये 200, केरळमध्ये 100, महाराष्ट्रात 50, ओडिशामध्ये 100, तामिळनाडूमध्ये 200, तेलंगणामध्ये 200 आणि पश्चिम बंगालमध्ये 100 पदांवर भरती करण्यात येणार आहे.


दरम्यान, अर्ज करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं ज्या तरुणांना अर्ज करायचा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळं युवकांनी संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जावे लागेल. यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.