Arjun Tendulkar IPL 2025 Auction : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दिवसेंदिवस चर्चेत असतो. आता अर्जुनने रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी करून चर्चेत आला आहे. गोव्याकडून खेळताना अर्जुनने आपल्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीत एक अशी कामगिरी केली, जी तो आतापर्यंत करू शकला नाही. अर्जुनने आपल्या शानदार स्पेलने अरुणाचल प्रदेशच्या फलंदाजांना जाळ्यात अडकले. अर्जुनने 9 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 25 धावा देत पाच विकेट घेतल्या. मेगा लिलावापूर्वी अर्जुनच्या या कामगिरीमुळे त्याला मोठी रक्कम मिळू शकते.
रणजी करंडक स्पर्धेच्या पाचव्या फेरीला सुरुवात झाली आहे. बुधवार 13 नोव्हेंबरपासून गोवा आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामना सुरू झाला. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अरुणाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अर्जुन तेंडुलकरने असा कहर केला की एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्याने दुसऱ्याच षटकात सलामीवीर नीबम हाचांगला बॉलिंग करून 8 धावांवर अरुणाचल प्रदेशला पहिला धक्का दिला.
काही वेळाने पुन्हा त्याने नीलम ओबीला बोल्ड आणि जय भावसारची शिकार केली. यानंतर त्याने चिन्मय पाटीलला झेलबाद करून मोजी झटेला बॉलिंग देत आपली 5वी विकेट मिळवली. अशाप्रकारे अर्जुनने अवघ्या 36 धावांवर पहिले पाचही फलंदाज बाद करून अरुणाचल प्रदेश संघाला एकहाती नेस्तनाबूत केले. संघाला त्यांच्या कहरातून सावरता आले नाही आणि पहिल्या डावात त्यांना केवळ 84 धावा करता आल्या. अर्जुनने त्याच्या स्पेलमध्ये तीन मेडन ओव्हर्सही टाकले. अर्जुनने एकाच डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करण्याची रणजी ट्रॉफीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. त्याने आपल्या 17 व्या प्रथम श्रेणी सामन्यात ही कामगिरी केली आहे.
अर्जुन तेंडुलकर आपल्या घातक जादूने आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेण्यात नक्कीच यशस्वी होईल. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याआधी अर्जुनच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याला लिलावात मोठी रक्कम मिळू शकते. मेगा लिलावापूर्वी अर्जुनला मुंबई इंडियन्सने रिलीज केले आहे. अर्जुनने पाच वेळच्या चॅम्पियन संघासोबत एकूण 5 सामने खेळले आणि यादरम्यान त्याने बॅटने 13 धावा केल्या, तर गोलंदाजीत 3 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -