Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. राजू श्रीवास्तव आता उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना नळीद्वारे दूध देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार राजू श्रीवास्तव यांना शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
राजू यांना उपचारासाठी पहिल्याच दिवशी एनेस्थेशियाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. हा डोस आता कमी करण्यात आला आहे. मात्र, तरीही मेंदूच्या आवश्यक प्रतिसादासाठी न्यूरो उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हात, पाय आणि घशात काही हालचाल दिसत असली तरी डोळ्याांची हालचाल मात्र फार महत्वाची आहे.
राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीत सुधारणा
10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांना दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र अलीकडेच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे माहिती समोर आली आहे.
एबीपीला मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. राजू आता उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांना नळीद्वारे लिक्विड देण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉमेडियनला शुद्धीवर येण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
राजू श्रीवास्तव 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर ते देशभरात लोकप्रिय झाले. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातही त्यांनी काम केले. राजू श्रीवास्तव 'बिग बॉस सीझन 3’मध्येही सहभागी झाले होते. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.
महत्वाच्या बातम्या :