Suryakumar Yadav Mercedes-Benz GLE Coupe : भारतीय संघातील मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या कार आणि बाईक्सच्या कलेक्शनसाठी बराच चर्चेत असतो. त्यालं वाहनं खरेदी करायला आवडत असून त्याने नुकतीच नवी कोरी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. मर्सिडीजची 'मर्सिडीज-बेंज जीएलई कूप (Mercedes-Benz GLE Coupe)' असं या मॉडेलचं नाव असून याची किंमत जवळपास 2.15 कोटी रूपये इतकी आहे. दरम्यान भारतीय ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) देखील रोल्स रॉयस (Rolls Royce) खरेदी करणार आहे.
कार आणि बाईक्सचा मोठा चाहता आहे सूर्यकुमार
मागील काही दिवसांपासून भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलेल्या सूर्यकुमारने दमदार प्रदर्शन केलं आहे. सद्यस्थितीला तो भारतीय संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे. दरम्यान सूर्यकुमारला क्रिकेटसोबतच कार आणि बाईक्स अशा विविध वाहनं खरेदी करण्याचीही आवड आहे. तो अनेकदा त्याच्या धांसू कार्स आणि बाईक्ससोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या सलामीला येणारा सूर्यकुमार केएल राहुलच्या पुनरागमनानंतर मधल्या फळीत फलंदाजी करेल असं मानलं जात आहे.
मुंबईने कोट्यवधींना केलं आहे रिटेन
सूर्यकुमार यादवने खरेदी केलेल्या नवीन मर्सिडीज बेंझची किंमत जवळपास 2.15 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे मर्सिडीज जगातील एक अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय ब्रँडपैकी आहे. दरम्यान इतकी महागडी गाडी सूर्यकुमारने घेतली असून यामागे त्याचा सध्याचा फॉर्म कारण आहे. मागील काही वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचं नाव बनलेला सूर्यकुमार भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा देखील महत्त्वाचा खेळाडू आहे. 2018 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आधी खरेदी केले होते. त्यानंतर यंदा 2022 च्या महालिलावपूर्वी देखील मुंबई इंडियन्सने 8 कोटी इतकी मोठी रक्कम खर्च करून यादवला कायम ठेवले
हे देखील वाचा-