एक्स्प्लोर

Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

Fact Check : पडताळणी दरम्यान डेस्कला जसप्रीत बुमराहचा अलीकडच्या काळातील फोटो मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेल्यानंतरचा त्याचा पहिला फोटो आहे.

नवी दिल्ली (साजन कुमार/प्रत्यूष रंजन पीटीआई फॅक्ट चेक) : सोशल मीडियावर भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याचे कथित फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो रुग्णालयात बेडवर झोपलेल्या स्थितीत पाहायला मिळतो. या फोटोंसह जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करणारा आहे. 

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा ठरला. या पडताळणीत हे फोटो एआय जनरेटेड असून बुमराह रुग्णालयात दाखल झाल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

दावा :

फेसबुक पेज ‘क्रिकेट दुनिया’ ने 7 फेब्रुवारीला जसप्रीत बुमराहचा कथित फोटो शेअर करुन "जसप्रीत बुमराहची बिघडलेली तब्येत, एक सच्चा देशभक्त होऊन तुम्ही एक लाईक देऊन आशीर्वाद आणि प्रेम द्या, तो भारताची शान आहे, आपली जान असून महान आहे." पोस्टची लिंकअर्काईव्ह लिंक आणि स्क्रीन शॉट इथं पाहा. 

Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

फेसबुक यूजर मोहम्मद कासिम ने लिहिलं, “जसप्रीत बुमराहची तब्येत खूप खराब आहे... ” पोस्टची लिंक, आर्काइव लिंक आणि स्क्रीनशॉट इथ पाहा.  

Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

पडताळणी: 

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, डेस्कने व्हायरल फोटोची गुगल लेन्सच्या मदतीनं रिव्हर्स इमजे सर्चद्वारे पडताळणी केली. यामध्ये आम्हाला काही सोशल मिडिया पोस्ट आढळल्या, ज्यामध्ये हा फोटो एआय जनरेटेड असल्याचं सांगण्यात आलं. पोस्टची लिंक इथं, इथं आणि इथ पाहा. 

Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

या आधारे पडताळणी पुढं सुरु ठेवत डेस्कनं फोटोंची एआय डिटेक्टर टूल, हाईव्ह मॉडरेशन आणि साइट इंजिन स्कॅन केलं. यामध्ये फोटो  99 टक्के एआय जनेरेटेड असल्याचं सांगण्यात आलं, स्क्रीन शॉट इथं पाहा. 

Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
यानंतर डेस्कनं कीवर्डच्या मदतीनं गुगल सर्च केलं. या दरम्यान आम्हाला काही रिपोर्ट मिळाले. ज्यामध्ये बुमराहाला गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु असताना अखेरच्या कसोटीमध्ये पाठीत दुखापत झाली होती. ज्यानंतर मेडिकल टीमसोत तो मैदानाबाहेर जाताना पाहायला मिळाला होता. पाठीच्या दुखापतीमुळं बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेला असून त्याच्या जागी हर्षित राणाला संधी मिळाली आहे.  मिडिया रिपोर्टस इथं, इथं आणि इथं पाहा.  

पडताळणी दरम्यान जसप्रीत बुमराहचा अलीकडील फोटो  डेस्कला मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेल्यानंतरचा तो बुमराहचा पहिला फोटो आहे. ज्यात बुमराह सेल्फी काढत असून तो फिट आहे.

बुमराहनं 13  फेब्रुवारी 2025 ला इन्स्टाग्रामव एक फोटो शेअर केला आहे. यावर त्यानं रीबिल्डिंग कॅप्शन लिहिलं आहे. मात्र, यामुळं बुमराह रुग्णालयात दाखल झाला नसल्याचं दिसून आलं. पोस्टचा सक्रीन शॉट इथं पाहा.  
 
Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एआय जनरेटेड आहे. बुमराह रुग्णालयात दाखल असल्याचा दावा चुकीचा आहे.  

दावा

जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली”

तथ्य

पीटीआई फॅक्ट चेक डेस्कच्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा असल्याचं सिध्द झालं.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो फेक असून दावा चुकीचा आहे. जसप्रीत बुमराह रुग्णालयात भर्ती झालेला नाही.  

[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा पीटीआयवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget