एक्स्प्लोर

Fact Check: भजन गायक अनुप जलोटा यांच्या धर्मांतराचा दावा खोटा,जुना फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

Fact Check : विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. खरेतर, अनुप जलोटा यांचा व्हायरल केला जात असलेला फोटो, त्यांच्या "भारत देश है मेरा" या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा आहे. जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): भजन गायक अनुप जलोटा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी हिरवा कुर्ता आणि इस्लामिक टोपी घातलेली दिसून येते. आता काही यूजर्स, हा फोटो शेअर करत असा दावा करत आहेत की, अनुप जलोटा यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. खरेतर, अनुप जलोटा यांचा व्हायरल केला जात असलेला फोटो, त्यांच्या “भारत देश है मेरा” या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा आहे. जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल

फेसबुक वापरकर्ता Kanhaiya Dixit ने 19 मार्च 2025 रोजी पोस्ट करत लिहिले की, “हे प्रसिद्ध भजन गायक, अनुप जलोटा आहेत ज्यांचे भजन जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आणि मंदिरात ऐकले जाते. 

काही दिवसांपूर्वी, त्यांनी, त्यांच्यापेक 50 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी प्रेम प्रसंग केला होता. आपण जास्त तपशीलात जाणार नाही. पण  तेव्हा त्याचे चारित्र्य समोर आले होते, पण आता त्यांनी आणखी पुढे मजल मारली आहे.

आपाला धर्मच बदलला, आता नाव देखील बदला”

फेसबुक पोस्टमधील मजकूर येथे जसाच्या तसा लिहिला आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल.

Fact Check: भजन गायक अनुप जलोटा यांच्या धर्मांतराचा दावा खोटा,जुना फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

पडताळणी 

व्हायरल दाव्याची चौकशी सुरू करताना, आम्ही गुगल ओपन सर्चचा वापर केला. आम्ही अनुप जलोटा यांच्याशी संबंधित बातम्या, संबंधित कीवर्ड टाइप करून शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे, याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी आम्हाला सापडली नाही.

परंतु शोधाच्या दरम्यान, आम्हाला अशा अनेक बातम्या सापडल्या, ज्यात लिहिले गेले की, हा त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील एक फोटो आहे. आम्हाला ndtv.in या वेबसाइटवर एक बातमी सापडली. 20 मार्च 2025 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीत असे लिहिण्यात आले होते की, भजन गायक, अनुप जलोटा यांनी आपला धर्म बदलला नाही परंतु हा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमधील फोटो आहे. अनुप जलोटा यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये ते दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. हे फोटो त्यावेळचे आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

Fact Check: भजन गायक अनुप जलोटा यांच्या धर्मांतराचा दावा खोटा,जुना फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

व्हायरल फोटोशी संबंधित बातम्या, इतर अनेक न्यूज वेबसाइटवर देखील आढळल्या.

तपास पुढे नेत, आम्ही अनुप जलोटा यांचे सोशल मीडिया हँडल तपासले. आम्हाला अनुप जलोटा यांच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हायरल झालेले फोटो सापडले. 18 मार्च 2025 रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “नाशिक या चैतन्यशील शहरात, “भारत देश है मेरा’ या चित्रपटाची शूटींग करण्यास उत्सुक आहे! #BhaaratDeshHaiMera #ShootingInNasik #FilmProduction #Bollywood #OnSet #BehindTheScenes #IndianCinema #Nasik”

Fact Check: भजन गायक अनुप जलोटा यांच्या धर्मांतराचा दावा खोटा,जुना फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर

आम्हाला येथे इतरही काही फोटो सापडले, जे “भारत देश है मेरा” चित्रपटाच्या शुटिंगमधील असल्याचे सांगितले जाते.

व्हायरल पोस्टच्या पुष्टीसाठी, दैनिक जागरणच्या वरिष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव, ज्या मुंबईत बॉलीवूड कव्हर करतात, यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी आम्हाला पुष्टी केली की, व्हायरल दावा खोटा आहे. हा फोटो अनुप जलोटा यांच्या चित्रपटाच्या शुटिंगमधील आहे.

शेवटी, आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. फेसबुकवर या वापरकर्त्याला 18 हजार लोक फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात, अनुप जलोटा यांच्या फोटोबद्दल केला जात असलेला दावा खोटा असल्याचे आढळून आले. त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही. हा फोटो त्याच्या आगामी “भारत देश है मेरा” चित्रपटाच्या शूटिंगचा आहे, जो आता खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. 

Claim Review : अनुप जलोटा यांनी त्यांचा धर्म बदलला आहे.
Claimed By : फेसबुक वापरकर्ता - Kanhaiya Dixit
Fact Check : False

[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

महत्त्वाच्या बातम्या

गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Embed widget