Amol Mitkari on Nilesh Lanke : आमदार निलेश लंकेच्या (Nilesh Lanke) खांद्यावर बंदूक घेऊन काही लोकांना आपला डाव साधायचा आहे. मागील आठ महिन्यात आमदार निलेश लंकेंना अजित पवारांनी (Ajit Pawar) साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी देऊनही त्यांनी हे पाऊल उचलले. आमदार लंकेंनी हा निर्णय घेऊन स्वतःला राजकीय काळोखात लोटल्याचा टोला राष्टवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लगावला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. अहमदनगर लोकसभा (Ahmednagar South Lok Sabha Constituency) लढवण्यासाठी निलेश लंके इच्छुक आहेत. हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला जाताच निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडत शरद पवार गटात सहभागी झाले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश लंकेंवर निशाणा साधला. 


शब्द दिल्याप्रमाणे निलेश लंकेंना अजित पवारांनी दिलं तिकीट


अमोल मिटकरी म्हणाले की, कोरोना काळात निलेश लंकेंचा लौकिक संपूर्ण देशभरात झाला. यात काही दुमत असण्याचे काम नाही. पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यापूर्वी ते शिवसेनेत होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांचे तिकीट कापले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यानंतर अजितदादांनी निलेश लंकेंना सांगितले तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला तिकीट देतो. त्यावेळी निलेश लंके म्हणाले होते की, अजितदादा जर तिकिटाचा शब्द देत असतील आणि प्रवेश देणार असतील तर मी राष्ट्रवादीत येतो. त्यावेळेस अजित दादांनी प्रवेश करून घेतला. शब्द दिल्याप्रमाणे लंकेंना तिकीट देण्यात आले.  त्यानंतर ते निवडून आले.  


निलेश लंकेंच्या डोक्यात लोकसभेची हवा घातली


महाविकास आघाडीत अजितदादा अर्थमंत्री असताना लंकेंना भरपूर निधी देण्यात आला. अलीकडे महायुतीच्या काळात 637 कोटी रुपयांचा निधी त्यांना आठ महिन्यात देण्यात आला होता. पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोणीतरी त्यांच्या डोक्यात लोकसभेची हवा घातली. 


निलेश लंकेंचे राजकीय भविष्य काळोखात


नगरमध्ये महाविकास आघाडीला कुठलाही उमेदवार मिळत नसल्याने म्हणून निलेश लंकेंचा वापर केला जातोय. त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांचे राजकीय भविष्य काळोखात आहे. ज्या लोकांसोबत ते गेले आहेत. तिथे त्यांना राजकीय भविष्य नाही. अजित दादांनीच त्यांना इथपर्यंत आणले आहे. त्यांना पाठबळ दिले आहे.  अजित दादांसोबत त्यांनी असे करणे अपेक्षित नव्हते, अशी माझी भावना असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Vasant More and Nilesh Lanke : अखेर निलेश लंके पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल, मात्र वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी, कारण काय?