Toxic Monday Box Office Collection: मंडे टेस्टला फेल की पास? 'टॉक्सिक' च्या कमाईत घट, प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली?
Yashs Toxic Box Office Collection: यशच्या 'टॉक्सिक'ने पहिल्या दिवशी 101.10 कोटींची दमदार कमाई केलीये.

Yashs Toxic Box Office Collection Day 6: यश (Yash) अभिनीत भारताचा बहुचर्चित सिनेमा 'टॉक्सिक' (Toxic) या सिनेमाने ओपनिंग डेपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. कियारा आडवाणी (Kiara Advani), नयतारा (Nayantara) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या. दरम्यान, गँगस्टर ड्रामा या सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली होती. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. दरम्यान, आता या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
'टॉक्सिक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या अपेक्षाप्रमाणे कामगिरी करु शकलेला नाही. या सिनेमाने विकेंडला दुहेरी अंकाने जबरदस्त कमाई केली. पण सोमवारी या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स' या सिनेमाने सोमवारी म्हणजेच सहाव्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
यशच्या 'टॉक्सिक'ने सोमवारी किती कोटींचे कलेक्शन केले? (Yashs Toxic Box Office Collection Day 6 Gangster Drama Movie)
'टॉक्सिक' या सिनेमाने ओपनिंग डेला म्हणजेच पहिल्याच दिवशी 101.10 कोटी रुपयांचे कलेक्शन करुन दमदार सुरुवात केली. मात्र, गँगस्टर ड्रामा या सिनेमाचा रिव्ह्यू सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं पाहायला मिळालं. 'टॉक्सिक' या सिनेमाला सध्या प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला होता. गुरुवार ते रविवार या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
पण दुसऱ्या आठवड्याचा दिवस सुरू होताच या सिनेमाचा कमाईचा वेग मंदावला. सोमवारी म्हणजेच सिनेमा रिलीज होण्याच्या सहाव्या दिवशी 'टॉक्सिक'च्या कमाईत लक्षणीय घट दिसून आली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, सोमवारी या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये 4.40 कोटींचे भारतात नेट कलेक्शन केले होते. तर, कन्नड भाषेमध्ये या सिनेमाने जवळपास 2 कोटी रुपयांची कमाई केली. मल्याळम भाषेमध्ये या सिनेमाने 7 लाखांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तर, तामिळमध्ये या सिनेमाने 30 लाखांपर्यंत घौडदौड केली. तसेच तेलुगुमध्ये या सिनेमाने 68 लाखांची कमाई केली. आतापर्यंत भारतात, 'टॉक्सिक' या गँगस्टर ड्रामा चित्रपटाने 221.55 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















