K.G.F: Chapter 2 : बहुचर्चीत चित्रपट 'केजीएफ-2' (K.G.F: Chapter 2) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात होते. यश(Yash), संजय दत्त (Sanjay Dutt) , रवीना टंडन (Raveena Tandon) आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. ट्रेलर लाँचच्या इव्हेटमध्ये संजय दत्तनं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले. 


यश म्हणजेच केजीएफच्या रॉकी भाईनं संजय दत्तचं कौतुक केलं. त्यानं सांगितलं, 'प्रकृती खराब असताना देखील त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं. यामधून त्यांचे डेडिकेशन दिसते. अनेकांना  माहित आहे की, कशा प्रकारे त्यांनी अॅक्शन सिक्वेन्सचं शूटिंग केलं. मी अॅक्शन सिन्समुळे खूप घाबरलो होतो. मी सर्वांना सावध राहायला सांगितले. मग संजय माझ्या जवळ आले आणि ते म्हणाले की, यश प्लीज माझी बदनामी करू नको. मी हे शूटिंग करणार आहे आणि मला हे करायचे आहे. मी बेस्ट काम करेल.'


पुढे यश म्हणाला, 'संजय सर हे एक योद्धा आहेत.' 'केजीएफ-2' च्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅन्सर या आजाराचा सामना संजय दत्त करत होता. पण तरी देखील त्यानं या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 
 
केजीएफ चॅप्टर-1 हा 2018 साली प्रदर्शित झाला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हिंदी बरोबरच तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषेमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha