Oscars Awards 2022 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आज (रविवारी) रात्री आठ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतही ऑस्करच्या शर्यतीत
94 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'द पॉवर ऑफ डॉग'ला सर्वाधिक नामांकने
सिनेजगतातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळात 'द पॉवर ऑफ डॉग'ला सर्वाधिक 12 नामांकने मिळाली आहेत.
भारतीय प्रेक्षकांना सोमवारी (२८ मार्च) पहाटे साडे पाच वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. हा सोहळा प्रेक्षक डिस्ने प्लस हॉटस्टार Disney + Hotstar वर लाइव्ह पाहू शकतात. तसेच स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवरदेखील या सोहळ्याचे प्रसारण होणार आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे यंदा तीन सेलिब्रिटी होस्ट असणार आहेत. लेखिका आणि कॉमेडियन वांडा सायक्स, स्टँड-अप कॉमेडियन एमी शूमर आणि अभिनेत्री रेजिना हॉल यंदाचा पुरस्कार सोहळा होस्ट करणार आहेत.
संबंधित बातम्या
ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
Happy Birthday Ram Charan : अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha