Yash Chopra Wife Death: दिग्दर्शक यश चोप्रा यांची पहिली पत्नी आणि आदित्य चोप्रा यांची आई पामेला चोप्रा यांचे 20 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. पामेला चोप्रा एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या. यासोबतच त्या चित्रपट लेखिका आणि निर्मात्या देखील होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला चोप्रा या गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. यानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


पामेलाचा मृत्यू मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे झाला


लीलावती हॉस्पिटलचे डॉ. प्रल्हाद प्रभुदेसाई यांनी एबीपीला पामेलाच्या मृत्यूची माहिती दिली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पामेला चोप्रा यांचा मृत्यू न्यूमोनिया, श्वासोच्छवासाचा त्रास आणि मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे झाला. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला चोप्रा यांनी 1970 मध्ये यश चोप्रासोबत लग्न केले होते. 






लेखिका-गायिका म्हणून पामेला यांची ओळख


पामेला चोप्रा यांची ओळख लेखिका-गायिका म्हणूनही होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये गाणीही गायली, ज्यात कभी कभी, नूरी, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मुझसे दोस्ती करोगी यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यशराजच्या चित्रपटांमध्ये निर्मात्या म्हणूनही त्यांचे नाव अनेकवेळा पडद्यावर आले. पामेला आणि यश यांना दोन मुले आहेत - आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा.


'द रोमँटिक्स' या डॉक्युमेंट्रीत शेवटच्या दिसल्या होत्या पामेला चोप्रा 


पामेला चोप्रा शेवटच्या यशराज फिल्म्सची (YRF) डॉक्युमेंट्री 'द रोमँटिक्स'मध्ये दिसल्या होत्या. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांनी पती यश चोप्रा आणि तिच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. 'द रोमँटिक्स' डॉक्युमेंट्रीने यश चोप्राच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानावरच लक्ष केंद्रित न करता पामेला यांच्या योगदानावरही लक्ष केंद्रित केले होते. या डॉक्युमेंट्रीमध्ये, पामेला यांनी त्या दिवसांचीही आठवण करुन दिली जेव्हा दिग्दर्शक यश चोप्रा यांनी निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट (दाग, 1973) प्रदर्शित केला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी अनेक रात्री न झोपता घालवल्या होत्या. महिलांचा दृष्टीकोन कसा असतो,  हे समजून घेण्यासाठी यश चोप्रादेखील अनेकदा त्यांच्या पत्नीची मदत घ्यायचे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Afwaah Trailer: एक अफवा तुमचं आयुष्य बदलवून टाकू शकते, नवाजुद्दीन सिद्दीकी- भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर रीलिज