एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: 'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला

Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळी अनेक वर्षांनी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पदार्पण करणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मालिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीनं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी घातली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहनं नव्या मालिकांचा (Star Pravah New Serial) धमाका प्रेक्षकांसाठी आणला आहे. एक, दोन नाहीतर तब्बल सहा नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येऊ घातल्या आहेत. या सहा मालिकांची चर्चा आहेच, पण त्यातल्या त्यात 'मराठी मिडियम' (Marathi Medium) या गाजलेल्या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. 'मराठी मिडियम' या मालिकेचं लेखन चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) करणार असून दिग्दर्शन मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) करणार आहेत. मंदार देवस्थळी अनेक वर्षांनी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पदार्पण करणार असल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मालिकेबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये चिन्मय मांडलेकरनं मंदार देवस्थळी यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर (Marathi Actor Chinmay Mandlekar) यानं नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना चिन्मयनं आपल्या आगामी मालिकेबाबत सांगितलं आहे. तसेच, त्यानं खूप दिवसांनी छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या मंदार देवस्थळींचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. 

अभिनेता चिन्मय मांडलेकर मंदार देवस्थळींबाबत नेमकं काय म्हणाला? (Chinmay Mandlekar Praises Director Mandar Devasthali)

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला की, "माझ्यासाठी मंदार देवस्थळी यांची प्रतिमा माझ्या पहिल्या मालिकेचा दिग्दर्शक, माझ्या पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक, एक अत्यंत उत्तम दिग्दर्शक, एक संवेदनशील व्यक्ती, हीच माझ्यासाठी त्यांची प्रतिमा आहे. त्याच्याव्यतिरिक्त जे काही झालं असेल, इतरांची त्यांच्याबद्दल जी काही मतं असतील, ती मी काही खोडून नाही काढणार. कारण, हा एका प्रक्रियेचा भाग आहे..."

"एक दिग्दर्शक म्हणून त्यांची कला आपण कोणीच त्यांच्याकडून हिरावून नाही घेऊ शकत. हा विश्वास फक्त माझा नाहीये. हा विश्वास निर्मात्यांचाही आहे, हा विश्वास मालिकेचाही आहे. तो एक दिग्दर्शक नाही तर तो माझा एक चांगला मित्रसुद्धा आहे. ज्यांनी सुरुवातीला मला मालिका क्षेत्रातील धडे दिले, त्यांच्यापैकी तो एक आहे. सर्व मळभ पुसून त्यानं पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि या मालिकेच्या निमित्तानं जर ते होणार असेल, तर मला खूप आनंद आहे..."

दरम्यान, 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळी बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 'वादळवाट', 'अवघाचि संसार' आणि 'आपली माणसं' यांसारख्या टीव्हीवर इतिहास घडवणाऱ्या सुपरहिट मालिका दिल्या आहेत. पण, अनेक कलाकारांनी त्यांच्यावर पैसे बुडवल्याचे गंभीर आरोप केलेत. 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेता शशांक केतकरनं तर आरोपांची मालिकाच व्हिडीओ शेअर करत केलेली. एकीकडे पैसे बुडवल्याच्या कलाकारांच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक मंदार देवस्थळी आता नव्या मालिकेमुळे चर्चेत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Who Is 33 Year Old Yudhvir Ahlawat: वय 33, पण साकारली 16 वर्षांच्या मुलाची भूमिका; सैफ अली खानच्या सीरिजमधल्या 'या' अभिनेत्यानं IMDb वर शाहरुख-ऐश्वर्यालाही टाकलं मागे

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget