एक्स्प्लोर

नाट्य पंढरीत मराठी रंगभूमी दिन साजरा; अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींना भावे पुरस्कार

नाट्य पंढरी सांगलीत जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सांगली - नाट्य पंढरी सांगलीत आज जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन पार पडले. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. आज कवी, लेखक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नाट्य पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. याच भूमीतून रंगभूमीचा जन्म झाला. विष्णुदास भावे, गोविंद बल्लाळ देवल, बालगंधर्व, मास्टर अविनाश अश्या अनेक दिग्गजांची जन्म व कर्म भुमी असणाऱ्या या सांगलीतून मराठी नाट्य सृष्टीला नवी दिशा मिळाली. 5 नोव्हेंबर 1843 मध्ये सांगलीमध्ये विष्णुदास भावे यांनी "सीता स्वयंवर" हे पहिले मराठी नाटक सादर केले होते. तेव्हापासून मराठी नाट्य क्षेत्रात 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन साजरा करण्याची परंपरा आहे. आजही नटराज पूजन व नाट्यसंगीत सादर करुन ही परंपरा सांगलीकर नाट्य प्रेमी जोपासत आहेत. आज विष्णुदास भावे नाट्य मंदिर याठिकाणी हा रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते नटराज व विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर या रंगभूमी दिनी विष्णुदास भावे यांचे नावे पुरस्कार देण्याची प्रथा गेल्या 54 वर्षांपासून सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. नाटक या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. संबंधीत बातम्या : आम्ही खरंच रसिक आहोत? ...तर मी नाटकात काम करणार नाही; सुबोध भावे संतापला

महत्त्वाच्या बातम्या

Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
Embed widget