Oscars 2022 : चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचे पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर पुरस्कार' (Oscars Awards). या जगातील सर्वात मानाच्या पुरस्काराकडे अवघ्या मनोरंजन विश्वाची नजर लागूल असते. दरम्यान यंदाचा ऑस्कर सोहळा देखील आज पार पडला नसून या सोहळ्याला एका घटनेमुळे काहीसे गालबोट लागले आहे. सुपरस्टार विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांच्या 2022 च्या ऑस्कर टेलीकास्ट दरम्यान काहीसा वाद पाहायला मिळाला. ख्रिस रॉक स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी आला होता. यावेळी ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पण ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने थेट स्टेजवर जात रॉक यांच्या कानशिलात लगावली.


रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट केली होती. यावरुन विल भडकला आणि त्याने रॉकच्या कानाखाली लगावली. मूळात जॅडा हीचे कमी केस हे कोणतीही स्टाईल नसून ती Alopecia नावाच्या टकल पडण्याच्या एका आजारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नसून अशामध्ये तिची केलेली मस्करी विलला अजिबात भावली नसल्याने त्याने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावली आहे. विलने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर तेथील उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.


संपूर्ण किस्सा सोशल मीडियावर व्हायरल


ख्रिसने यावेळी पुन्हा माझ्या पत्नीचं नाव नको घेऊस असा दम रॉकला भरला तर रॉकनेही यावेळी त्याला असं करणार नाही अशी हमी दिली. पण हा सारा प्रकार पाहून तेथे उपस्थितांसह टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक देखील शॉक झाले. विशेष म्हणजे या घटनेनंतर विल आणि रॉक दोघेही ट्रेंड होऊ लागले. सोशल मीडियावर हा व्हीडीओ आणि घटना तुफान व्हायरल होऊ लागली आहे.


पाहा व्हिडीओ



इतर महत्त्वाच्या बातम्या





  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha