Dune : ऑस्कर 2022 (Oscars 2022) पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘ड्युन’ने आतापर्यंत 11 श्रेणींमध्ये 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. सहा पुरस्कार पटकावत ‘Dune’ने ऑस्करमध्ये ‘सिक्सर’ मारला आहे. चला तर, जाणून घेऊया ‘Dune’ चित्रपटाला कोणकोणत्या श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत...


बेस्ट फिल्म एडिटिंग


यावेळी ऑस्कर 2022 सोहळ्यात, डेव्हिड लिंच दिग्दर्शित अमेरिकन सायन्स फिक्शन चित्रपट ड्युनला ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’ श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला आहे. चित्रपटाच्या संपादनावर टीका झाली. परंतु, त्यातील प्रभावशाली अॅक्शन सीक्वेन्स आणि अभिनयाची खूप प्रशंसा झाली आणि चित्रपटाने ‘बेस्ट फिल्म एडिटिंग’मध्ये ऑस्कर जिंकला आहे.


बेस्ट ओरिजनल स्कोअर


फिल्म ‘ड्युन’ने ‘बेस्ट ओरिजनल स्कोर’ श्रेणीमध्ये दुसरा ऑस्कर पटकावला आहे. या चित्रपटाची कथा अरकिस या वाळवंटी ग्रहावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कुलीन कुटुंबांमधील संघर्षाचा वर्णन करते.


बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन


94व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये ‘ड्युन’ चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन’साठी देखील ऑस्कर पटकावला आहे. चित्रपट निर्माते राफेला जे लॉरेंटिस निर्मित, ‘ड्युन’ला सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी ऑस्कर देखील मिळाला आहे. त्यांच्या डिझाईन्सद्वारे, पॅट्रिस व्हर्मेट आणि कुझस्ना सिपोस यांनी एक तल्लीन जग निर्माण केले, ज्यामुळे चित्रपटाच्या उत्कृष्ट कथाकथनात तसेच व्हिज्युअलमध्ये बराच फरक पडला.


बेस्ट साऊंड


चित्रपट ड्युनने ऑस्कर 2022 मध्ये ‘बेस्ट साऊंड’ श्रेणीमध्ये देखील पुरस्कार जिंकला आहे. मॅक रुथ, मार्क मॅंगिनी, थियो ग्रीन, डग हेम्फिल आणि रॉन बार्टलेट यांनी या चित्रपटाचा साऊंडस्केप एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.


बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स


‘ड्युन’ला त्याच्या जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी देखील पुरस्कार देण्यात आला आहे. चित्रपटाच्या उत्कृष्ट ग्राफिक्ससाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘ड्युन’ चित्रपटातील सर्व दृश्ये अतिशय प्रभावी पद्धतीने नैसर्गिकरित्या साकारण्यात आली आहेत.


बेस्ट सिनेमॅटोग्राफी


94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’साठी देखील फिल्म ‘ड्युन’ला पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट एक विज्ञान कथा आणि थ्रील ड्रामा चित्रपट होता, ज्यामध्ये परस्पर संघर्षाची कथा दाखवली गेली होती. हा चित्रपट 22 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. Warner Bros./ Legendary Pictures'च्या ‘Dune’ ने जगभरात $400M चा टप्पा ओलांडला आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha