Beed News Update : गेल्या तीन दिवसापांसून गायब बीडमधील ऊसतोड मुकादमाचा मृतदेह सापडला आहे. धारूर शहरातील किल्ल्याच्या शेजारी असलेल्या लाला खडक परिसरातील खोरीत आज हा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.  


धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या तीन बाजुने बालाघाटची डोंगर रांग आहे. किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या लाला खडक भागातील खोरीत आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून शहरातीलच व्यक्तीचा असल्याचा प्राथमिक अंदाज होता. चौकशी केल्यानंत तो मृतदेह ऊसतोड मुकादम नवनाथ धपाटे यांचा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून साठ वर्षीय मुकादम बेपत्ता होते. हा मृतदेह त्यांचाच असून याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.  


नवनाथ धपाटे यांचा मृतदेह आज सकाळी किल्ल्याच्या बाजूला असलेल्या दरीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यांच्या खिशातील आधारकार्डमुळे त्यांची ओळख पटली. नवनाथ धपाटे हे शुक्रवारपासून गायब होते. त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. गायब झाल्यानंतर नवनाथ धपाटे हे कोणाशी भेटले? व कुठे गेले होते? त्याचा तपास आता पोलिस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


महत्वाच्या बातम्या


राज्यभरातील दारू विक्रेत्यांना सरकारचा मोठा दिलासा, वाढीव परवाना शुल्क दर शासनाने केले कमी


Breaking: नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? ईडीने संपत्तीची मागवली माहिती


कहाणी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर घोटाळ्याची, पोलिसांच्याच तिजोरीवर मारला कोट्यवधींचा डल्ला


यशवंत जाधवांनी मातोश्रीला दिलेल्या 50 लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावरील जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल ; किरीट सोमय्यांचा टोला