Allu Arjun Video : 'पुष्पा 2'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचपासून ते प्री-रिलीज इव्हेंटपर्यंत, निर्माते प्रत्येक टप्प्यावर तो भव्य करण्यात व्यस्त आहेत. अल्लू अर्जुन पाटणा येथे मोठा ट्रेलर लॉन्च आणि कोची येथे एका भव्य कार्यक्रमानंतर, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतही पोहोचला. जिथे आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने आपल्या भव्य आणि स्टाइलिश एन्ट्रीने सर्वांची मने जिंकली. मात्र, अल्लू अर्जुनने यावेळी मराठीतून संवाद साधत अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले. 

Continues below advertisement


कसं काय मुंबई! अन् जल्लोष


प्रमोशन इव्हेंटसाठी अल्लू अर्जुनने संपूर्ण काळ्या रंगाचा पेहराव केला होता. अल्लू अर्जुन व्यासपीठावर येताच त्याचं जोरदार  स्वागत करण्यात आलं. उपस्थित असलेल्या लोकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. यानंतर अल्लू अर्जुनने सर्वांना अभिवादन केलं. तो म्हणाल की, कसं काय मुंबई! अल्लू अर्जुनला मराठीत बोलताना पाहून सर्वांनाच अत्यानंद झाला. 



दरम्यान, अल्लू अर्जुनच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला आहे. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने मुंबईतील पुष्पा 2 प्रेस मीटमध्ये शानदार एन्ट्री केली. दरम्यान, रश्मिका मंदान्नाने आपल्या स्टायलिश एंट्रीने खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय, प्रेस मीटचे फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये अल्लू अर्जुनची स्टाइल, क्लास आणि करिश्मा स्पष्टपणे दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, स्टार अल्लू अर्जुन मुंबईतील पुष्पा 2 प्रेस मीटमध्ये त्याची शैली आणि लालित्य दाखवतो.


अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकत्र


पुष्पा 2: द रुलच्या निर्मात्यांनी आज 'पीलिंग्स' या गाण्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना पुष्पराज आणि श्रीवल्लीच्या भूमिकेत पुन्हा एकत्र आले आहेत. हे शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ज्या गाण्याच्या प्रोमोची तुम्ही सर्वजण वाट पाहत होते ते गाणे शेवटी आले आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे आणि Mythri Movie Makers निर्मित आहे. चित्रपटाचे संगीत टी-सीरीजद्वारे रिलीज केले जाणार आहे. 'पुष्पा 2' बद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडण्यास सज्ज झाला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या