Kartik Amavasya Upay 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला देखील विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. तशीच आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya) साजरी केली जातेय. या अमावस्येला देखील विशेष महत्त्व आहे.
प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी ही अमावस्या तिथी 1 डिसेंबर रोजी असते. धार्मिक मान्यतेनुसार, अमावस्येच्या दिवशी पितर मृत्यूलोकपासून पृथ्वीतलावर येतात. यासाठी पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध यांसारख्या गोष्टी केल्या जातात. यामुळे पितृदोष दूर होतात आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात. आज कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्य़ासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे ते जाणून घेऊयात.
अन्नदान
पितरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी कार्तिक अमावस्येच्या दिवशी अन्नदान करणं गरजेचं आहे. या दिवशी स्नान आणि तर्पणच्या नंतर कच्चे तांदूळ, डाळ, गहू यांसारख्या वस्तू दान केल्या जातात. यासाठी घरात सात्विक भोजन करा.
दीप दान करा
कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने दीप दान करा. एक गोष्ट लक्षात घ्या की, दीप दान करताना सूर्यास्ताआधी करा. त्यानंतर मातीच्या दिव्यात रात्री तेल घालून तो दिवा तेवत ठेवा. दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला ठेवा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो.
गाय आणि तुळशीची पूजा करा
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर कार्तिक अमावस्येच्या दिवशी गाईची सेवा करा आणि तुळशीची पूजा करा. गाईची पूजा केल्याने पुण्य फळ मिळते. त्याचबरोबर तुळशीच्या कृपेने अनेक समस्या दूर होतात. यामुळे तुमच्या घरात सुख,समृद्धी आणि धनसंपत्ती येते.
गरुड पुराणाचं पठण करा
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल आणि यामुळे तुम्हाला सलग संकटांचा सामना करावा लागत असेल तर अमावस्येच्या दिवशी गरुड पुराणाचं पठण करा. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. तसेच, भगवान विष्णुची तुमच्यावर कृपा राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :