Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याच ॲडलेडच्या मैदानावर या मालिकेतील दुसरा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. या दिवस-रात्र सामन्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या PM XI विरुद्ध 2 दिवसांचा सराव सामना खेळत आहे, ज्यामुळे भारतीय संघाची तयारी आणखी मजबूत होईल. या सामन्यात पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. पहिल्या दिवशीचा खेळ सुद्धा पावसाने वाया गेला होता.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सराव सामन्यासाठी परतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिल्या सामन्याला मुकला होता पण आता तो परतला आहे आणि त्याने संघाची कमान हाती घेतली आहे. या सराव सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांना तयारी पूर्ण करण्याची चांगली संधी आहे. भारताला दमदार सुरुवात करून देत मोहम्मद सिराजने पहिली विकेट घेतली.
रोहित शर्मा मैदानात उतरताच एकच जयजयकार
दरम्यान, रोहित शर्माचा जलवा ऑस्ट्रेलियात सुद्धा पाहायला मिळाला. मैदानात आगमन होताच चाहत्यांनी मुंबईचा राजा म्हणत एकच जयजयकार करण्यात आला. विशेष मुंबई इंडियन्सच्या कप्तानपदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुद्धा हार्दिक पांड्याला या घोषणेचा सामना करावा लागला होता.
पावसामुळे सामना पुन्हा थांबला
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एकादश संघाने 7 षटकांत 2 गडी गमावून 22 धावा केल्या आहेत. भारताकडून मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी 1-1 विकेट घेतली. पावसामुळे हा सामना पुन्हा थांबवण्यात आला, त्यामुळे आता हा सामना 46 षटकांचा करण्यात आला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत कृष्णा मोहम्मद, प्रसिध्द बुमराह, प्रसिध्द , आकाश दीप, हर्षित राणा, सरफराज खान, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल
पीएम इलेव्हन संघ
जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महाली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन, जॅक निस्बेट
इतर महत्वाच्या बातम्या