The Kashmir Files : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारा चित्रपट   'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये अनुपम खेर (Anupam Kher), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि दर्शन कुमार (Darshan Kumar) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच   विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)

   यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर  केली. या पोस्टमधून द कश्मीर फाइल्सला दिलेल्या पसंतीबद्दल  प्रेक्षकांचे अभार मानले आणि नव्या चित्रपटाची घोषणा केली. 


विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'ज्यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रटाचे कौतुक केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आम्ही गेली चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. या चित्रपटाच्या माध्यमामधून लोकांपुढे आम्हाला कश्मिरी पंडितांची गोष्ट मांडाची होती. आता वेळ आली आहे नव्या चित्रपटासाठी काम करण्याची.' या ट्वीटला विवेक यांनी रिप्लाय देऊन #TheDelhiFiles असं लिहिलं. त्यामुळे आता कश्मीर फाइल्सच्या यशानंतर विवेक हे 'द दिल्ली फाइल्स' या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत, असं या ट्वीटमधून लक्षात येते. 






द कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  या चित्रपटानं 250 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. 


हेही वाचा :