Vivek Agnihotri Tweet On 'The Kashmir Files Second Part' : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला गेल्या वर्षी जगभरातून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. हा चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही चित्रपटाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं तर काहींनी यावर टीकाही केली होती.वादाच्या मोठ्या भोवऱ्यात हा चित्रपट त्यावेळी अडकला होता.
आता याच चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.याची माहिती स्वत:दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे ज्यावर फक्त एक शैतानच प्रश्न करू शकतो. ‘रडायला तयार राहा’ असं म्हणत अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित केला आहे. त्यामुळे चाहत्यांची मोठी अपेक्षा आता या चित्रपटाकडून आहे.
'द कश्मीर फाइल्स'चा बोलबाला कायम
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमावर प्रचंड टीका झाली होती. पण तरीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्ल्वी जोशी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करण्यात आले होते. भारतात या सिनेमाने 252.90 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात या सिनेमाने 340.92 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला 'इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार' (Indian Television Academy Awards) सोहळ्यात 'गोल्डन फिल्म' (Golden Film) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अमानुष छळाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना त्या वेळी चांगलाच भावला होता.
इतर महत्वाच्या बातम्या