एक्स्प्लोर

Vishal Dadlani on Sonam Wangchuk: 'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'

हा व्हिडिओ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत पोहोचवा असंही त्यांनी म्हटलं. विशाल दादलानी यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे.

Vishal Dadlani on Sonam Wangchuk: शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. 20 जूननंतर जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचा आंदोलनात ते सहभागी झाले होते. नीट परीक्षेच्या सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी आता चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांसह सेलिब्रेटी, राजकीय नेते, स्टॅन्ड अप कॉमेडियन्स, गायक मनोरंजन सृष्टीतील दिग्गज लोक सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचा आवाहन करत आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या निष्क्रियतेबाबत चिंता व्यक्त केली असून सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहे. दरम्यान, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, झीनत अमान, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप ,अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, हेमंत ढोमे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान, बॉलीवूडचा लोकप्रिय गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) यांनीही सोनम वांगचुक यांच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळे आंदोलनात येऊ शकलो नसल्याचं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना उपोषण थांबवण्याचा आवाहन केलं. हा व्हिडिओ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत पोहोचवा असंही त्यांनी म्हटलं. विशाल दादलानी यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले विशाल दादलानी?

बॉलीवूड गायक विशाल दादलानी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी तिथून एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपले instagram अकाउंट ला शेअर केलाय. ते म्हणाले 'मी हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी बनवतोय जे सध्या जंतर-मंतरवर आपल्या देशासाठी लढत आहे.मी सध्या तुमच्यासोबत नाही कारण मी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.पण माझं मन तिथेच आहे आणि हे तुम्हाला माहित आहे. .कृपया हा व्हिडिओ सोनम वांगचुकजींपर्यंत पोहोचवा.आणि त्यांना सांगा की मी त्यांच्यासोबत तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला माफ करा.जर मी भारतात असलो असतो तर मी नक्की तिथेच असतो.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

विशाल पुढे म्हणाले 'तुम्ही लोक एक चांगला लढा देत आहात. माझी एकच इच्छा आहे की त्यांना काहीही होऊ नये.मी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करतो.मी सरकारला विनंती करतो की त्यांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.त्यांच्या हक्काबाबत कोणीही युक्तिवाद करत नाही.हा सरकार बदलण्याचा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्काचा, त्यांच्या भविष्याचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे.मी सरकारला विनंती करतो की कृपया त्यांनी लोकांचा आवाज ऐकावा.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget