Virajas Kulkarni Share Post : अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे 3 मे रोजी लग्नबंधनात अडकले. विराजस आणि शिवानी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. नुकताच विराजसनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) या दिसत आहेत. विराजसनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित त्याला एक मजेशीर सल्ला देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये रोहित म्हणतो, 'हाय विराजस, तुझम लग्न झालं आहे असं मला कळालं. तुला पुढी आयुष्यासाठी शुभेच्छा. पण लक्षात ठेव लग्न झालं तरी सर्वात जास्त प्रेम आईवर कर.'
विराजसचं हटके कॅप्शन
व्हिडीओला विराजसनं कॅप्शन दिलं, 'UPG आणि Whistling Woods मध्ये शिकत असताना रोहित शेट्टी ह्यांच्या गेस्ट लेक्चरला बसण्याची संधी अनेकदा मिळाली - आणि इतक्या अभ्यासपूर्ण, प्रामाणिकपणे, आणि मनापासून मारलेल्या गप्पा ऐकून तृप्त झालो होतो... आता इतक्या वर्षांनी पुन्हा त्यांच्या खास शैलीमध्ये महत्त्वाचा हा गमतीशीर सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!'
'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून विराजस घराघरांत पोहोचला होता. तर 'बन मस्का' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांच्या भेटीस आली.
संबंधित बातम्या
- Ravi Jadhav : 'नटरंग' ते 'टाइमपास 3'... कसा होता दिग्दर्शक रवी जाधव यांचा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास? पोस्ट चर्चेत
- Mohan Juneja Passes Away : ‘केजीएफ 2’ फेम अभिनेते मोहन जुनेजांचे निधन, बंगळूरूमध्ये घेतला अखेरचा श्वास
- Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माॅं कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित