Say No To War : युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) सुरू असलेल्या युद्धाची चर्चा जगभरात होत आहे. या युद्धावर प्रसिद्ध संगीतकार जतिन-ललित यांच्यामधील ललित पंडित यांच्या रोहांश पंडित (Rohansh Pandit) या 19 वर्षाच्या मुलानं 'से नो टू वॉर' (Say No To War) हे गाणं कंपोज केलं आहे. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हे गाणं लाँच करण्यात आलं. 


'से नो टू वॉर'  या गाण्याला हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये तयार करण्यात आलं आहे. हे गाणं जावेद अली आणि अँड्रिया जेरिमियाह यांनी गायले असून राहुल बी. सेठ, अनुष्का शिवशंकर आणि रोहांश पंडित हे या गाण्याचे गीतकार आहेत.  


सुप्रसिद्ध लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी 'से नो टू वॉर' हे युद्धविरोधी गाणे रिलीज केले. हे गाणे लाँच होत असताना तिथे जावेद अख्तर यांच्यासोबतच ललित पंडित, गायक जावेद अली, अँड्रिया जेरेमिया, गीतकार समीर, गायक शान, नील नितीन मुकेश, गायिका अलका याज्ञिक यांसारख्या संगीत विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 


'से नो टू वॉर'  गाणं रिलीज करताना जावेद अख्तर यांनी संगीतकार रोहनश पंडितचे कौतुक केले. त्यांनी सांगितलं की, युद्धाच्या वातावरणात अशा प्रकारच्या गाण्यांची गरज आहे.  1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटातील 'मेरे दुश्मन, मेरे दोस्त, मेरे हमसे...' हे युद्धविरोधी गाणे जावेद अख्तर यांनी स्वतः लिहिले होते आणि ते खूप लोकप्रिय झाले होते. त्या गाण्याबाबत देखील जावेद अख्तर यांनी सांगितले. 



एबीपी न्यूजनं गाण्याच्या लाँचच्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी सध्या मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून होत असलेल्या अजानबाबत तसेच हनुमान चालिसा पठण या वादावरप्रश्न विचारला. या प्रश्नाला त्यांनी उत्तर  देण्यास नकार दिला. 


ललित पंडित, रोहनश पंडित आणि कबीर पंडित या तिघांनीही या गाण्याच्या निर्मितीबद्दल आणि त्याचे महत्त्व याबद्दल गाण्याच्या लाँचच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं. 


हेही वाचा :