Virajas KulKarni Birthday : आजचा दिवस हा चार वर्षांनी एकदा येतो. 29 फेब्रुवारी ही लीप दिवस म्हणून साजरा केला जातो. अनेकांचा वाढदिवस आजच्या दिवशी येतो, त्यामुळे चार वर्षांनी एकदाच अशा लोकांना त्यांचा वाढदिवस साजरा करायला मिळतो. अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) याचा देखील वाढदिवस आजच्याच म्हणजेच 29 एप्रिल रोजी असतो. त्यानिमित्तानं विराजसची आई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
विराजस हा झी मराठीवरील माझा होशील ना? या मालिकेतून घराघरात पोहचला. त्यानंतर विराजस हा रंगभूमी आणि मोठ्या पडद्यावरही झळकला. तसेच त्यांना चित्रपटांच्या दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. विराजसला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या मित्र मैत्रीणी तसेच त्याच्या चाहत्यांनी देखील या खास दिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.
मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत
मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं की, प्रिय विराजस, आज 29 फेब्रुवारी - तुझा वाढदिवस ! अभिमान वाटावा अश्या अनेक गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात.. पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे "तू" आहेस ...! जसे कष्ट तू करतो आहेस , त्यावरून हे नक्की, की येणारं वर्ष " तुझं " असणार आहे ..असाच निर्मळ रहा.. स्वप्नं बघणं सोडू नकोस आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास ही ! आम्हा दोघांकडून खूप प्रेम !!!! चार वर्षानी येणारा तुझा विशेष वाढदिवस नेहेमीच विशेष असू दे !! सध्या मृणाल कुलकर्णी यांची ही पोस्ट बरीच चर्चेत आली आहे.
विराजसने सांभाळली दिग्दर्शनाची धुरा
'व्हिक्टोरिया' या सिनेमाच्या माध्यमातून विराजसने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते. तर आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 16 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'व्हिक्टोरिया' चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे शुटींग स्कॉटलंड येथे झाले आहे. तसेच विराजस हा दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.