एक्स्प्लोर

'राजा शिवाजी'च्या पोस्टरवर विक्की कौशलची कमेंट, नेटकऱ्यांचं जिंकलं मन; 'छावा' अंदाजात दिली आदरांजली

Vicky Kaushal Aabasaheb comment on Raja Shivaji: विकी कौशलने 'आबासाहेब' अशी कमेंट रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या पोस्टरवर केली आहे.

Bollywood celebrities reaction to Raja Shivaji poster: शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेहरावात दिसत आहे.  त्याच्या हातात तलवार आणि भगवा झेंडा दिसत आहे.  

रितेश देशमुखला या शैलीत पाहून प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं. चाहत्यांनी कमेंट करुन आगामी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. दरम्यान, या सगळ्यात  रितेश देशमुखच्या पोस्टवरील एका कमेंटची  प्रचंड चर्चा होत आहे.  ती कमेंट बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने केली आहे. रितेश देशमुखने 'राजा शिवाजी', या चित्रपटाचा  पोस्टर शेअर केला.  या पोस्टरवर विकी कौशल कमेंट केली, त्या कमेंटची सध्या चर्चा होत आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

छावा' चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने, रितेश देशमुख याच्या पोस्टवर "आबासाहेब" अशी कमेंट केली. तसेच रितेशला मानाचा मुजरा दिला. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून 'शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद' असल्याचे म्हटले जात आहे.  या कमेंटवर नेटकऱ्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.  केवळ विकीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सायली संजीव, मिलाप झवेरी, रमेश तौरानी, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमृता खानविलकर, मनीष पॉल, राहुल देव, लिझेल रेमो डिसूझा आणि मुश्ताक शेख यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील पोस्टर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारीत आहे.  या चित्रपटासाठी रितेश देशमुखने विशेष मेहनत घेतली.  या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील रितेश देशमुख सांभाळणार आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  सध्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget