T Rama Rao Passes Away : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टी रामा राव (T Rama Rao) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक तेलुगू आणि हिंदी चित्रपटांची दिग्दर्शन टी रामा राव यांनी केले. 1979 मध्ये टी रामा राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जुदाई, एक ही भूल, अंधा कानून, वतन के रखवाले, दोस्ती दुश्मन, नाचे मयूरी, जॉन जॉनी जनार्दन, मुकाबला, हथकडी, जंग या चित्रपटांचे टी रामा राव यांनी दिग्दर्शन केलं.1966 ते 2000 या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक हिट चित्रपटांचे टी रामा राव यांनी दिग्दर्शन केलं.टी रामा राव यांच्या 'जीवन तरंगल', 'अनुराग देवता' आणि 'पचनी कपूरम' यांसारख्या तेलुगू चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट शेअर करून टी रामा राव यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ' टी रामा राव हे खुप दयाळू होते. तसेच त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर देखील चांगला होता. मला त्यांच्या आखिरी रास्ता आणि संसार या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.'
संबंधित बातम्या