Ajay Devgn, The Kapil Sharma Show : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा  'रन वे' (runway) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. बिग बी तसेच अजयसोबतच रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), आकांक्षा सिंह आणि अंगिर धार हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रन वे चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटच्या टीमनं द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय हा कपिलची खिल्ली उडवताना दिसत आहे. 


अजय देवगणनं ग्रे आणि ब्लू कलरचा सूट अशा डॅशिंग लूकमध्ये एन्ट्री केली. त्याचा लूक पाहून कपिल म्हणातो, 'अजय बँकमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे का?हँडसम दिसत आहात.' हे ऐकल्यानंकर अजय कपिलला म्हणाला, 'तु चांगले कपडे घालत नाही. त्यामुळे मी विचार केला की मी चांगला लूक करून या शोमध्ये एन्ट्री करावी.'





रन-वे हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. 


संबंधित बातम्या