एक्स्प्लोर

वरुण धवनला मुंबई मेट्रोत स्टंट करणं भोवलं, VIDEO शेअर करत MMMOCLने लगेच सुनावलं, कारवाईचा इशारा

मुंबई मेट्रोच्या संचालनाची जबाबदारी असलेल्या MMMOCL (महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड) ने याची गंभीर दखल घेत अभिनेता वरूण धवनला कारवाईचा इशारा दिलाय.

Varun Dhavan Mumbai Metro: सध्या सर्वत्र ‘बॉर्डर 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटगृहांमध्ये बॉर्डर2 सिनेमासाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी हाउसफुल बोर्ड लागले आहेत. दरम्यान, या सिनेमातील अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई मेट्रोमध्ये केलेल्या एका कृतीमुळे वरुण वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, हा प्रकार त्याला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. 

नेमकं घडलं काय?

मुंबई मेट्रोच्या कोचमध्ये वरुण धवन हँडलला लटकून व्यायाम करताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. इतकंच  नाही तर त्याच्या बाजूला असलेल्या एका तरुणालाही तो हॅन्डलवर लटकायला लावतो. काही चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचं आणि फिटनेसप्रेमाचं कौतुक केलं, तर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनावर टीकाही केली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई मेट्रोच्या संचालनाची जबाबदारी असलेल्या MMMOCL (महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड) ने याची गंभीर दखल घेत अभिनेता वरूण धवनला कारवाईचा इशारा दिलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी टाळण्यासाठी वरुणने आपली कार न वापरता मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवासादरम्यान त्याने मेट्रोमधील एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. मात्र, याच दरम्यान त्याचा मेट्रोमध्ये हँडलला लटकून पुल-अप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटलं. प्रकरण वाढू लागल्यानंतर MMMOCL ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून वरुण धवनचा व्हिडीओ शेअर करत त्याला स्पष्ट शब्दांत समज दिली. संस्थेने सांगितलं की, अशा प्रकारचे स्टंट प्रवाशांच्या सुरक्षिततेस धोका ठरू शकतात. मेट्रोमधील ग्रॅब हँडल हे प्रवाशांनी तोल सांभाळण्यासाठी असतात, व्यायाम किंवा करमणुकीसाठी नाहीत, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

 

काय म्हटलं MMMOCL ने?

MMMOCL ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “अ‍ॅक्शन चित्रपटांप्रमाणे या व्हिडीओसाठीही डिस्क्लेमर आवश्यक होता. कृपया असे प्रयोग महामुंबई मेट्रोमध्ये करू नका.” तसेच मेट्रो रेल्वे (ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स) कायदा, 2002 अंतर्गत अशा प्रकारचं वर्तन दंडनीय गुन्हा ठरू शकतं, असंही नमूद करण्यात आलं आहे. परिस्थितीच्या गंभीरतेनुसार दंड किंवा कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, मात्र नियमांचे पालन करत जबाबदारीने प्रवास करावा, असं आवाहनही महामुंबई मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
Embed widget