Jug Jugg Jeeyo : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा  जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. मंगळवारी (14 जून) वरुण, कियारा आणि  अनिल कपूर (Anil Kapoor)  यांनी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास केला. या दरम्यान कियारा आणि वरुणनं वडापाववर ताव मारला. कियारा आणि वरुणचा मेट्रोमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कियारा आणि वरुण हे वडापाव खात आहेत, असं दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी कियारा आणि वरुणला ट्रोल केलं आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 
'मेट्रोमध्ये कोणतेही पदार्थ खाण्यास मनाई असून देखील हे वडापाव का खात आहेत?', असा प्रश्न विचारत अनेक नेटकऱ्यांनी वरुण आणि कियाराला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'मेट्रोमध्ये खाण्यास बंदी आहे, यांना VIP ट्रिटमेंट मिळाली वाटतं. ' व्हिडीओमध्ये अनिल कपूर, वरुण आणि कियारा हे मेट्रोमध्ये फोटो काढताना देखील दिसत आहेत.


पाहा व्हिडीओ :






जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच  धर्मा प्रोडक्शन,  वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  जुग जुग जियो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी  सुपरस्टार सिंगर 2 या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


हेही वाचा :