Happy Birthday Imtiaz Ali : बॉलिवूड इंडस्ट्रीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक, लेखक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांचा आज (16 जून) वाढदिवस आहे. इम्तियाज यांचा जन्म 16 जून 1971 रोजी जमशेदपूर, झारखंड येथे झाला. अभिनेता व्हायचं हे त्यांनी आधीच निश्चित केलं होतं. त्याच उद्देशाने त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाय ठेवला होता. पण, ते अभिनेत्याऐवजी दिग्दर्शक बनले. यानंतर त्यांनी बॉलिवूडला ‘जब वी मेट’ ते ‘तमाशा’ यांसारखे एकापेक्षा एक आयकॉनिक चित्रपट दिले.


इम्तियाज अली यांनी 2005 मध्ये 'सोचा ना था' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही. यानंतरही त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गडगडतच होते. मात्र, 2007 पासून इम्तियाज अली यांचे नशीब बदलले आणि बॉलिवूडला एक सुपरहिट चित्रपट मिळाला, ज्याने शाहिद आणि करिनाच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. हा चित्रपट होता ‘जब वी मेट’. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.


जब वी मेट


इम्तियाज यांच्या ‘जब वी मेट’ने सगळ्याच प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘जब वी मेट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात करिनाने साकारलेली गीत ही व्यक्तिरेखाही सर्वांच्या मनात घर करून गेली.


रॉक स्टार


2011मध्ये इम्तियाज अलीने आणखी एक प्रेमकथा सादर केली, जी सर्वांच्या हृदयात घर करून गेली. या चित्रपटासाठी दिग्दर्शक इम्तियाज अली यांना या सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागांमध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. हा चित्रपट होता ‘रॉकस्टार’. रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.


हायवे


2014मध्ये आलेल्या ‘हायवे’ या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसले होते. आलियाने या चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या चित्रपटात प्रवासासोबतच एक वेगळी प्रेमकथा दाखवण्यात आली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.


लव्ह आज कल


2009मध्ये रिलीज झालेल्या ‘लव आज कल’मध्ये सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी मुख्य भूमिकेत होती. एकाचवेळी अनेक कालखंडात सुरु असलेली ही प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. एकाच वेळी हा चित्रपट प्रेक्षकांना वेगवेगळ्या कालखंडात आणि त्या काळातील विश्वात घेऊन जात होता.


तमाशा


2015मध्ये रिलीज झालेल्या ‘तमाशा’ या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून इम्तियाजने पुन्हा एकदा वेगळ्या शैलीतील प्रेमकथा सादर केली होती. या चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा आहे, जो बॉर्डरलाइन डिसऑर्डरने ग्रस्त आहे.


हेही वाचा :


Suchitra Krishnamoorthi : 'लेकीनं डेटिंग साईटवर टाकली प्रोफाईल अन्...'; सुचित्रा कृष्णमूर्तीने केला गौप्यस्फोट


B Praak Baby Death : "वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट