एक्स्प्लोर

मेनोपॉज वाईट, चार्जर तुटलेला फोन असल्यासारखं वाटलं..मासिक पाळीवरून ट्विंकल खन्नाचं वक्तव्य चर्चेत

Twinkle Khanna Talks About Menopause Journey: ट्विंकल खन्नाने मेनोपॉजबाबत उघडपणे अनुभव शेअर केला. तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Twinkle Khanna Talks About Menopause Journey: अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्त्यासाठी ओळखली जाते. तिचं कायम मनातलं ओठांवर असतं.  तिनं दिलेली मुलाखत असो किंवा तिचे व्हिडिओ, ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्रीनं लाईफस्टाईलबाबत माहिती दिली. तसेच मेनोपॉजबाबत खुलासा केला. तिचा मेनोपॉजचा प्रवास नेमका कसा होता?  याबाबत तिनं सांगितलं. 'मला खराब चार्जरवाला फोन असल्यासारखं वाटलं', असं ट्विंकल म्हणाली.  मेनोपॉजबाबत कुणीही उघडपणे बोलत नाही.  मात्र, ट्विंकलने मेनोपॉजबाबत मोकळेपणाने भाष्य केले.  ट्विंकलचा मेनोपॉजपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता?  पाहुयात.

ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत

अलिकडेच ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तीन फोटो शेअर केले होते.  या फोटोंमध्ये ती मेकअप फ्री लूकमध्ये दिसली. या फोटोंवर तिनं लक्षवेधी कॅप्शन दिलं. या कॅप्शनमधून तिनं मेनोपॉजचा प्रवास शेअर केला. अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की,   '52 या वर्षात, मेकअप फ्री.   मी म्हणेन की दुपारचा थोडासा सूर्यप्रकाश बरं वाटण्यासाठी, तसेच   सुंदर दिसण्यासाठी पुरेसं आहे.  परंतु, मेनोपॉज इतके उदार नाही.  मी बऱ्याचदा विनोद करत होते, की मेनोपॉज माझ्यापेक्षा वाईट आहे.  मला खराब चार्जरवाला फोन असल्यासारखं वाटलं", असं तिनं सांगितलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

'स्वत:ला स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे'

"मला आता बरे वाटते आहे. मी माझे वय स्वीकारले आहे. मी नियमित वेट ट्रेनिंग करते. उत्तम आहार. तसेच पुस्तकांमध्ये आनंद शोधणे या सगळ्याच गोष्टी मी करते. शेवटी काय तर, स्वत:ला स्वीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे", असंही तिनं सांगितलं.  ट्विंकल खन्ना स्वत:च्या तब्येतीची योग्य काळजी घेत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तिनं  उत्तम जीवन जगण्याचा मंत्र निवडला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं मेनोपॉजदरम्यान, घेत असलेल्या सप्लिमेंट्सबद्दलही सांगितले. "अजूनही  हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या फायद्यांचा आणि तोट्यांचा काळजीपूर्वक विचार करत आहे. सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा", असा सल्लाही तिनं दिला. सध्या ट्विंकल खन्नाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  तिनं पोस्टद्वारे मेनोपॉजचा प्रवास शेअर केल्यामुळे तिचं  नेटकऱ्यांकडून कौतुकही होत आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget