Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात रोज नव- नवीन माहिती समोर येत आहे. आता तुनिषाच्या आईने तिचा मित्र शीजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तो ड्रग्ज घेत होता आणि यातून दोघांचे भांडण होत असे, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. या आरोपानंतर पोलिस आता शीजानच्या कुटुंबाची चौकशी करणार आहेत. कुटुंबीयांना याबाबत माहिती आहे की नाही, याचा पोलिस तपास करणार आहेत. 


तुनिषाच्या आत्महत्येचा पोलिसांकडून तपास सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी शीजान खानची पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आज तुनिषाच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. या चौकशीसाठी गुप्त ठिकाण निश्चित करण्यात आले होते. या ठिकाणी तुनिषाची आई, मावशी आणि मामाचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यावेळी तिच्या आईने शीजान ड्रग्ज घेत होता असा आरोप केलाय. "शीजान ड्रग्ज घेत होता. यातून त्या दोघांमध्ये वाद होत असत. त्याने ड्रग्ज घेऊ नये असे तुनिषाला वाटत होते. परंतु, तुनिषा प्रेमात असल्यामुळे तिची फारशी हरकत नव्हती. त्यामुळेच तिने याकडे फारसे लक्ष दिले नसावे, असा जबाब तुनिषाच्या आईने पोलिसांनी दिलाय. या माहितीनंतर आता पोलिस त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असून त्यांना ड्रग्जची माहिती होती की नाही हे पाहणार आहे.


तुनिषाचे शीजान खानशी असलेल्या प्रत्येक कनेक्शनचा पोलिस शोध घेत आहेत. ड्रग्जबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शीजान खानला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. मेडीकल तपासणीनंतर  त्याचा अहवालही लवकरच येईल, असे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस हे या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणातून अधिक तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे.


Tunisha Sharma Suicide Case :  काय आहे प्रकरण?


20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी तिचा मित्र शीजान खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने आरोप केला होता की, शीजानने तुनिशाला हे कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली. तुनिषाच्या आईच्या तक्रारीनतर पोलिसांनी शीजानला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. 


महत्वाच्या बातम्या


Tunisha Sharma: 'ती आत्महत्या करुच शकत नाही'; तुनिषा शर्माच्या मामानं व्यक्त केल्या भावना