Cameron Green Injury Update : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (AUS vs SA) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाल दुखापत झाली. ग्रीनची ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रीनचं बोट फ्रॅक्चर झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. पण ग्रीनच्या या दुखापतीनं आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) डोकेदुखी वाढली आहे. कारण इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी झालेल्या लिलावात ग्रीनला मुंबई इंडियन्सने तब्बल 17.50 कोटींना विकत घेतलं, पण अशात आता तो दुखापतग्रस्त झाल्यानं मुंबईच्या चिंता वाढल्या आहेत.


ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दमदार असा एक डाव 182 धावांनी विजय मिळवला. पण सामन्यात ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले. यात कॅमेरुन ग्रीन यालाही दुखापत झाली. त्यामुळे तो आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून आधीच बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या रिपोर्टनुसार, कॅमेरून ग्रीनने तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता, त्यांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ग्रीनला दुखापत झाली होती. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खियाच्या बाऊन्सरमुळे तो जखमी झाला, त्यानंतरही त्याने तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं, पण आता त्याला सर्जरी करावी लागणार आहे.


दिल्ली-मुंबईमध्ये कॅमरुनसाठी रंगली चुरस


इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडला आहे. ग्रीनला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी लढत झाली, ज्यामध्ये मुंबईने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि त्याला संघात सामील करण्यासाठी 17.50 कोटी रुपये खर्च केले. ग्रीनचे नाव समोर येताच, सर्व संघानी इतक्या वेगाने बोली लावली पाहता पाहत 10 कोटींचा टप्पा ओलांडला. ज्यानंतर अखेर तो 17.50 कोटींना विकला गेला. सॅमनंतर सर्वात महागडा खेळाडू ग्रीन ठरला आहे.


लिलावात मुंबई इंडियन्सनं विकत घेतलेले खेळाडू - कॅमरुन ग्रीन (17.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).


हे देखील वाचा-