Tumbbad 2 : मानवी लोभ प्रवृत्तीवर आधारित असलेला 'तुंबाड' (Tumbbad) हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. त्यानंतर हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम सिनेमाला दिलं. दरम्यान हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमागृहातच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज देण्यात आलं आहे.
तुंबाड-2 च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर तुंबाड-2 घोषणेचा प्रोमो सध्या बराच व्हायरल होत आहे. हस्तर भाकरीसाठी भुकेला होता आणि ज्याला विनायक राव फसवून सोन्याच्या नाणी चोरायचा, असा आशय या सिनेमाचा होता.
सहा वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल
दरम्यान तब्बल सहा वर्षांनी तुंबाडचा सिक्वेल येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये म्हटलंय की, 'तुंबाड-2 कमिंग सुन' त्यामुळे प्रेक्षकांनी पुन्हा तुंबाडच्या पुर्नप्रदर्शनानंतर हस्तरची दहशत अनुभवता आली आणि आता तुंबाड-2 ही लवकरच भेटीला येणार आहे.
'शिप ऑफ थिसियस' या सिनेमातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता सोहम शाहने तुंबाड या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात ज्योती माळे, दीपक दामले, अनिता दाते, रंजिनी चक्रवर्ती यांच्याही सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान आता तुंबाड 2 ची कथा कशी असणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात झाली आहे.