Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) कितीही राडे झाले तरीही कुणालाही हिंसा करण्याची परवानी नाही. पण आर्या आणि निक्कीमध्ये झालेल्या राड्याने हिंसक रुप घेतल्याचं पाहायला मिळालं. टास्कमध्ये निक्की आणि आर्या दोघीही आक्रमक झाल्या आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. कुणावरही हात उचलण्याची परवानगी बिग बॉसच्या घरात नाही. हा बिग बॉसचा मुलभूत नियम आहे. पण आर्याच्या या वागण्यामुळे बिग बॉसकडून आता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
आर्याकडून जेव्हा निक्कीला कानाखाली मारण्यात आली, त्यावेळीही बिग बॉसने तिला झापलं. आर्याने हेतूपुर्वक निक्कीवर हात उचलला असल्याचं बिग बॉसने म्हटलं. तसेच या प्रकरणाचा अंतिम निर्णय हा भाऊच्या धक्क्यावर होणार असल्याचंही बिग बॉसने सांगितलं. तोपर्यंत आर्याला बिग बॉसने जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. पण आता बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.
रितेश भाऊंनी आर्याला झापलं
रितेश भाऊंनी आर्याला तिची बाजू मांडण्याचीही संधी दिली. पण त्याआधी रितेश भाऊंनी म्हटलं की, 'आर्या या आठवड्यात तुमचा एक गेम होता, समोरच्याला ब्लॉक करायचं. तो तुमचा गेम होता. पण त्यावर तुमचं एक सेटमेंट होतं, निक्की असं वागते मग मी पण अशी वागणार. आर्या मी निक्कीला चुकीच्या वागण्यावर ओरडलो आहे, पूर्ण सीझनसाठी त्यांची कॅप्टन्सी देखील काढून घेतली. त्यामुळे मी तिलाही ओरडलो आणि तुम्हालाही ओरडणार. आर्या तुम्ही स्वत:ला काय समजता. तुम्हाला राग आला की तुम्ही कोणावरही हात उचलणार. हे बिग बॉसचं घर आहे. याआधीही घरात अशी स्थिती निर्माण झाली. पण तेव्हा कुणीही कुणावर हात उचलला नाही. पण मला सगळ्यात जास्त राग तुम्ही तुमची चूक मान्य नाही केली याचा आला आहे. म्हणजे थोडक्यात आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटेशनल होतं.'
बिग बॉसने जाहीर केला निर्णय
भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने म्हटलं की, 'कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि आर्याने हात उचलला. आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही', असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे.
आर्याला प्रेक्षकांचा पाठिंबा
दरम्यान आर्याने निक्कीला कानाखाली मारली तेव्हापासून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून आर्याचं कौतुक होतंय. आर्याने संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आर्याला इतका सपोर्ट असताना तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय कितपत योग्य ठरणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.