Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसने (Bigg Boss Marathi New Season) आर्याने केलेल्या कृत्याची शिक्षा करत तिला घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्स पूर आला असून बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना अमान्य असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे बिग बॉस प्रेमींनी बिग बॉससह बिग बॉसचा नवा होस्ट रितेश देशमुखवरही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
बिग बॉसने जेव्हा ही घटना घडली त्यावेळी आर्याला झापत तिला जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिली. त्यानंतर याचा निर्णय भाऊच्या धक्क्यावर होणार असल्याचं बिग बॉसने जाहीर केलं होतं. शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने आपला अंतिम निर्णय जाहीर केला. पण रितेश भाऊनेही आर्याला चांगलच सुनावलं.
रितेश भाऊवरही प्रेक्षक नाराज
दरम्यान प्रेक्षकांनी रितेश भाऊवरही नाराजी व्यक्त केली आहे. रितेश देशमुख खूप वाईट होस्ट आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, रितेश भाऊ तुम्ही कृपया गोलमाल, वेलकमचे 3,4,5,6,7,8सिक्वल करा फक्त. हे जमत नाहीये मिकीला कितीही झापले आणि शिक्षा दिली तरी तिच्या थोबाडावर तेव्हा कायम हसू असतं. खाली मुंडकं घालून हसत असतेच आणि काल हे डोअर मॅट आर्याला विचारतं, काय आर्या हसू येतंय का? शिवाय अरबाज ने अभिजीत ला काल जे जोरात ढकलले ते योग्य होत का? तिथे रुल ब्रेक नाही झाला का? ती हिंसा नव्हे? इतका बायस खेळ का खेळतोय डोअर मॅट? या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. मायबाप प्रेक्षकांचा हक्क आहे तो. महाराष्ट्राला अपेक्षित अस काहीतरी चांगलं करा आणि दाखवा.
पुढे एका युजरने कमेंट करत म्हटलं की, भाऊचा धक्का आज चुकीचा होता पूर्ण पणे जेव्हा पाण्यामध्ये नाचायचं टास्क होत तेव्हा तर निक्की पूर्ण आनंद घेत होती तेव्हा सर्जरी झाली नव्हती का आणि संग्राम भाऊने तिला पाण्यामध्ये गळ्यापर्यंत जायला सांगितलं होत त्या नंतर धक्का दिला आहे bigg boss निर्णय योग्य घ्या हे आज कोणालाच आवडलेल नाही, भाऊचा धक्का नाही, भाऊला निक्कीचा पुळका