एक्स्प्लोर

Tumbadchi Manjyla Box Office Collection: तुंबाडच्या मंजुळेचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसांतच कोटींची उड्डाणं; आतापर्यंत किती कमावले?

दोन दिवसांतच चित्रपटाने बजेटचा लक्षणीय हिस्सा वसूल केल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात चित्रपट नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tumbadchi Manjula Box office collection: मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे वर्ष चांगलेच गाजताना दिसत आहे. 'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद 2'नंतर आता 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटानेही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार छाप पाडली आहे. 5 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल झालेल्या 'तुंबाडची मंजुळा'ला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसला. रिलीजच्या दिवशी चित्रपटाने 54 लाख रुपयांची कमाई करत समाधानकारक सुरुवात केली. मात्र, खरा खेळ दुसऱ्या दिवशी सुरू झाला. शनिवारी चित्रपटाच्या तिकीटबारीवर गर्दी वाढली आणि कमाई थेट 98 लाख रुपयांपर्यंत पोहोचली.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी झालेली ही झेप तब्बल 81 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या यशाबाबतचा आत्मविश्वास निर्मात्यांमध्ये आणि वितरकांमध्ये वाढला आहे.

4 दिवसांत किती कमावले?

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 'तुंबाडची मंजुळा'ने देशांतर्गत बाजारात 3.70 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर एकूण नेट कमाई 3.31 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. विशेष म्हणजे, सध्या अनेक चित्रपट थिएटरमध्ये सुरू असतानाही या चित्रपटाने स्वतःचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. .

चित्रपटाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता रविवारीही कमाईत आणखी वाढ झाली. शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान, चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी दोन दिवसांतच चित्रपटाने बजेटचा लक्षणीय हिस्सा वसूल केल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात चित्रपट नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रेक्षकांना नेमकं काय आवडलं?

'तुंबाडची मंजुळा'च्या कथानकासोबतच त्यातील भय आणि विनोदाचा समतोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत असून, त्याचा थेट फायदा तिकीटबारीवर होत असल्याचे मानले जात आहे. अनेक प्रेक्षक चित्रपटाची शिफारस करत असल्याने वर्ड-ऑफ-माऊथची ताकदही चित्रपटाला मिळतेय आहे.

विविध कोरगावकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भावेश जानवळेकर यांनी केली आहे. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भूतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी आणि अंशुमन विचारे यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. एकंदर पाहता, सुरुवातीच्या दोन दिवसांत मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता 'तुंबाडची मंजुळा' मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक हिट चित्रपट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आता पुढील आठवड्यात हा चित्रपट किती वेगाने धावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget